सदाशिव पेठेतील सदर राम मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मुख्य गर्भागृहात श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. तसेच सभा मंडपात श्री हनुमंत आणि श्री रामदास स्वामी यांच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे,सदर मूर्ती पंढरपूरचे श्री मंडवाले ह्यांनी त्यांना दिलेल्या श्री समर्थांच्या चित्रानुरूप हुबेहूब बनवली आहे.