श्री दशभुजा गणपती मंदिर, पुणे

श्री दशभुजा गणपती मंदिर, पौड फाटा 03 श्री मृत्युंजयेश्र्वर मंदिर, कोथरूड उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे जेष्ठ चिरंजीव तथा दाजीबा फडके यांची कन्या सौ.राधाबाई यांचा विवाह 16.02.1797 रोजी रावबाजी उर्फ बाजीराव (व्दितीय )पेशवा यांचे बरोबर साजरा झाला. या विवाहाच्या वेळी फडके घराण्याच्या मालकीचा कोथरूड येथील बगीचा आंदण म्हणून देण्यात आला. नुसता बगीचा नको महणून बगीच्या मध्ये श्री मृत्युंजयेश्र्वर शिवमंदिर बांधण्यात आले. याच वेळी पौड फाटा येथील श्रीदशभूजा गणपती मंदिर व पुणे शहरा बाहेरील मोती बाग सुध्दा आंदण म्हणून दिली.श्रीमंत रावबाजी यांनी मोतीबागेत विश्रामबाग वाडा बांधला. पेशवाईच्या अखेरीस रावबाजी यांनी पर्वती ,सारसबाग , श्री दशभूजा, मॄत्युंजयेश्र्वर या खाजगीतील मंदिरांची व्यवस्था शहरातील पाच प्रतिष्ठित व्यक्तींकडे सोपवली.1846 मध्ये ही सर्व मंदिरे मिळून श्री देवदेवेश्र्वर संस्थान स्थापन झाले.

Make Donation

For Donation scan the above QR Code Or click the QR Code

Event Schedule

Photo Gallary