पूर्वी च्या काळी शिवाजी महाराज श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करून ब्राह्मणांना दक्षिणा दान देत. ह्याला श्रावण मास दक्षिणा दान असे म्हणतात. पुढे हि प्रथा पेशव्यांनी कायम ठेवली. ज्या ठिकाणी हे दक्षिणा वाटप केले जाई त्या ठिकाणाला रमणा असे म्हंटले जाई. आधी हा कार्यक्रम रमण बागेत होत असे. पण नंतर जागेच्या अभावी हा कार्यक्रम पर्वती च्या पायथ्याशी असलेल्या ह्या रमणा गणपति मंदिर परिसरात होऊ लागला. पर्वती च्या पायथ्याशी तटबंदी बांधुन पन्नास ते साठ हजार लोक मावतील अशी सोय करण्यात आली. ह्या तटबंदी च्या ओसरीवर ब्राह्मणांची राहण्याची सोय केली जायची. एका ऐतिहासिक नोंदी नुसार त्याकाळी एक लाख एकोणचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये एवढा खर्च ह्या कार्यक्रमासाठी झाला. त्यानंतर इंग्रजांच्या काळात गव्हर्नर एल्फिन्स्टन ने ही प्रथा बंद केली. आता हे गणपति मंदिर ह्या इतिहासाची साक्ष देत आहे