श्री देवदेवेश्वर मंदिर ,पर्वती , पुणे

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मातोश्री श्रीमंत काशीबाईसाहेब यांचा नवस पूर्णकरण्यासाठी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वराचे भव्य मंदिर बांधले. मंदिरात विधिपूर्वक मिती वैशाख शुध्द पंचमी ,शके 1671, दिनांक 23 एप्रिल 1749 रोजी श्री शिवलिंग व श्री शंकराची मूर्ती यांची स्थापना केली.(श्री शंकराला येथे श्री देवदेवेश्वर असे संबोधिले जाते.) मूर्तीच्या एका मांडीवर श्री पार्वती व दुर्सया मांडीवर श्री बालगणपती बसलेले आहेत.या मूर्ती चांदीचा व सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत.या तिन्ही मूर्ती भारतीय धातूकामचे अपूर्व सुंदर नमुने म्हणून निर्देशित करता येतील. श्री देवदेवेेश्वराच्या गार्भायाच्या उजव्या बाजूस एक संगमरवरी पाषाणाची अती सुंदर श्री गणपतीची मूर्ती आहे.श्री देवदेवश्वराची स्थापना करण्यात आली तेंव्हा पुण्याहवाचनाचे वेळी आरंभी नेहमीप्रमाणे सुपारी ऐवजी गणपतीची प्रत्यक्ष मूर्ती स्थापन करण्यात येऊन तिला आवाहन करण्यात आले.या गणपतीस “सदरेतील गणपती” असे म्हणतात. मंदिराचे चार टोकांवर चार कळस असून मध्यभागी सर्वात उंच म्हणजे 6 फूट व्यासाचा आणि 7 फूट 2.5 इंच उंचीचा कळस असून या कळसांना सोने चढवून मुलामा देण्यात आला आहे. या मुख्यदेवालयाभोवती भक्कम असा सुमारे आठ फूट उंचीचा दुमजली अष्टकोनी तट आहे.तटाचे आत प्रदक्षिणेच्या वाटेवर श्री सूर्य, श्री गणपती,श्री भवानी व श्री विष्णु या देवतांची चार देवळे अनुक्रमे आग्नेय, नैऋत्य, व्यायव्य आणि र्इशान्य कोर्पयांवर आहेत.ही मंदिरे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी इ.स.1766 मध्ये बांधली. त्यामुळे या देवस्थानास “श्री शिव पंचायतन” असे स्वरूप प्राप्त झाले...

Make Donation

For Donation scan the above QR Code Or click the QR Code

Event Schedule

Photo Gallary